एकविसाव्या शतकात म्हणतात समान आपण झालो
सांग मला खरंच कारे आपण समान झालो?
अजूनही पूजेत सुद्धा आम्हीच मम म्हणतो
सप्तपदी करताना तुझ्याच मागून चालतो तरीही तू म्हणतोस आपण समान झालो?
तुझ्या डब्या पासून मुलांच्या अभ्यासाची कसरत आम्हीच किरे करतो
कामवाल्या बाईनं पासून घरच्या रेशनपाण्यामध्ये आम्हीच किरे लक्ष घालतो
भाऊबीज असो किंवा पडावा असो तुम्ही बसता आम्ही ओवाळतो
आमच्या ताम्हनात टाकलेली ओवाळणी आनंदाने घेतो
मग ती स्त्री कितीही कमावती असली तरी
ताम्हनातली भेट अंगावर लेऊन मिरविते
सांग रे सख्या खरंच कारे आपण समान झालो असे तुला वाटते
अरे शेवटी आम्ही दानाचीच वस्तु नाही का
म्हणून आई वडील कन्यादान करत नाहीत का?
मग दानाला कुठलं आलंय अस्तित्व
म्हणूनच असतं कारे पुरुषा मागेच बाईच असणं
सांगा ना हो आई बाबा कुठं झालो आम्ही समान
दानाची वस्तू बनवून तुम्हीच केलात स्त्रीचा अवमान
आई कळा सोसते,आई दुध पाजते
तरीही मुलांच्या नावा मधे बाबांचंच नाव येते
त्या कशाचं बद्दल तक्रार नाही हो आमची
ज्याची त्याची जागा असते ज्याचं महती
समानतेची परिभाषा आता आपण बदलूया
खांद्याला खांदा लाऊन चालायचा प्रयत्न तरी करूया
तू माझं महत्व जाण मी तुझं जाणते
निसर्गानेच दिलेल्या विभिन्नतेचा मान आपण राखुया
चल संगती चालू आपण हातात घालून हात
शतक कुठलंही असुदे समजुतीनेच देऊ एकमेकांना साथ
-Author Archana kulkarni