आवरीत होते कपाटातील कपड्यांचा कप्पा
हळूच उलगडत होते स्मृतींचा टप्पा
काही तलम तर काही सुती
स्पर्श मात्र त्यांचा मखमली
कपड्यांचे खच वाढत होते
पण जुन्या कपड्यांशी नातें तुटत नव्हते
मन घट्ट् करून शेवटी
काहींना दिली तिलांजली
कुणी तरी कुठे तरी
माझ्या स्मृतींचे जतन करण्यासाठी
शेवटी कप्पा स्वच्छ झाला
जीवन चक्राच्या नियमा प्रमाणे
नवीन आले जुने गेले
पण स्मृतीगंध ठेवून गेलेलेखिका- वैशाली देव