A Poem By Sneha Lugade
पाऊस आणि तू
तुम्ही दोघेही सारखेच,
दोघे म्हणजे तू आणि पाऊस
दोघांनाही न कुणाची पर्वा,
न कुणाची काळजी
मनमानेल तसे येता,
कधी अचानक, तर कधी दबा धरून
धो धो बरसून सैर भैर करता हि सारखेच,
आणि प्रेमाने बरसून चिंब भिजवता हि सारखेच
कधी वाटते तुम्ही दोघांनीही येऊच नये आयुष्यात,
न प्रेम करायला, न हिरमोड करायला
कधी तरी शहाण्या मुलासारखे वागा रे,
पुढच्याचे मन समजून बरसा रे
खूप वेळेची चाहूल लावून निराश करा,
आणि अचानक येऊन मिठीत शिरा!
– स्नेहा लुगडे,
21- 06 – 2016
( पहिल्या पावसानंतर सुचलेली)
- To publish your articles in Puneri Thaska Magazine please write to us at puneri.thaska@gmail.com