
एकमेकांवर नजर भाळली आणि पत्रिका ही जुळाली,
गुरुजींच्या भाकिता नुसार ,राम सीतेची जोडी ठरली .
अगदीच जुळतायत छत्तीस गूण ,
पण जुळवून घायला लागेल सूर
गुरुजी म्हणाले ..एक मात्र आहे नाडी .
रडत खडत ओढावी लागेल संसाराची गाडी.
नवीन नवीन सगळ कसे छान चालले होते ,
शोना ,हनी ,बेबी ,पिल्लू ,
यू लव्ह मी नि आय लव्ह यू ❤️

बघता बघता वर्षे गेली आणि आमच्या बाळाची चाहूल लागली,
ऍडव्हान्स ट्रीटमेंट घेऊन ,भारताच्या राजधानीत पूत्रप्राप्ती झाली!
त्यापुढं कदाचीत काहीतरी वेगळंच होणार होते ,
गुरुजींचं भाकीत खरे ठरणार होते ,
इथुनच झाली सुरू ,ईरी शिरी ,
तू अशील टॉपर इंजिनिअर ,
पण मी देखिल आहे निष्णात डॉक्टर ,
मी नाही होणार फक्त फुल टाइम मदर ,पण त्याचा हट्ट ,
तुला बनायला लागेल ओन्ली होम केअर टेकर ,
आणि वाढता वाढता वाढत गेला इगो फॅक्टर .
अनेकदा पॅच अप् चा केला प्रयत्न ,पण
मध्यस्थयांसकट सगळेच झाले असमर्थ ,
सरतेशेवटी प्रेम आणि सेल्फ रिस्पेक्ट ,
यांमध्ये चालू झाली स्पर्धा ,
आणि ना ईलाजानें माझ्या पिल्लाला घेऊन निघाले संसार सोडून अर्धा !

परत एकदा पत्रीके ची चाचणी चालू झाली ,
या वेळेस तर ,फेस रीडिंग ,हॅन्ड रीडींग ,प्राणिक हीलर आणि हो टॅरोट कार्ड रिडर ची सुद्धा वारी झाली ,
याचवेळेस माझ्या फॅमिली ची खूप साथ मिळाली
बघता बघता वर्ष उलटली ,लेकाची आता मुंजीची वेळ झाली ,
गाडी बंगला कार दारात आली ,स्टेटस मनी पोसिशन हि मिळाली ,
कायद्यांची लढाई देखील चालू झाली,पण या सगळ्यात लेकाची मानसिकता भरडली गेली ,
वेल विशर्स , नातेवाईक ,मित्र मैत्रिणी नि दिले सल्ले
यू आर स्टील यंग, बोल्ड अँड बिऊटीफुल
कम ऑन मुव्ह ऑन ,यू कॅन स्टार्ट युअर न्यू लाइफ ,
मी म्हंटलं नो – आय वूड रादर प्रेफर टू किक स्टार्ट माय लाईफ !
कारण आय नो डॅट आय एम अ गुड वाइफ
खरे म्हणजे इगो च्या पलीकडे काहीच नव्हते ,
पण माघार कोण घेईल ,कोणालाच हारायचे नव्हते ,
बऱ्याचदा विचार आला ,लेट्स सिट अक्रोस द टेबल,
लेकासाठी का होईना ,लेट्स ब्रेक धिस हसल ..पण
कदाचित नशीब म्हणत होते आय वॉन्ट टू सी सम मोर स्ट्रगल
लेकाला सुद्धा सवय झाली होती बाबा नसण्याची ,
किंवा कदाचित तोही वाट बघत असेल त्याला अक्कल येण्याची
गुरुजीं च्या भाकीता नुसार,
वनवासाची गेली आज सरून पैकी ११ वर्ष
शिल्लक बाकी मात्र अजून तीन वर्ष ,
राम सीतेचे मिलन ,अशक्य नाही पण कठीण होय
झालंच मिलन तर होइल हर्ष .
बघता बघता वनवास संपला ,
गुरुजी म्हणाले नवर देवाला बोलवा ,
वय वर्षे पंचवीस ,देखणा गोरापान राजबिंडा चेहरा
सहा फूट उंच असा मिर्चन्ट नेव्हीत ला हॅंडसॉम मोहरा
आज लेकही होणार होता कोणाचा तरी नवरा
गर्दीत कुजबुज होत होती ,
आमच्या ठकी नि एकटयाने वाढवलाय लेकाला ,
“तो “ दिसत नाही,पत्रिका तर दिलीहोती ,
आज तरी “बाप “म्हणून त्याची हजेरी अपेक्क्षीत होती
त्याने देखील कधी नाही केला दुसऱ्या लग्नाचा विचार
त्त्याचा देखील आहे स्पष्ट नाकार ,
दोघेही झालेत हे निव्वळ इगो चे शिकार
मी मात्र उगाच ग्रेस फुली एजींग च्या नावाखाली
सासू होण्याची फॅक्ट टाळत होते ,
सारख सारख बॅनक्वेट हॉल चा एंट्रन्स न्याहाळत होते ,
क्षणभर म्हंटले भास होतोय मला …का फीलिंग नॉस्टॅल्जिक
तो खरोखरच माझ्या समोर होता हे होत नव्हते मला क्लिक
नातेवाइकांनी हेरली होती त्याच्या डोळ्यातली व्यथा
हात जोडून उभा होता ,अन डोळ्यात होती लेकाची आस्था
गुरुजींनी अंऊन्समेंट केली,
मुलाचे मामा ,मुलीचे मामा स्टेज वर या ,
सोबत वधू वारांच्या माता पिताना हि बोलवा,
मुलाची मनात होत होती घालमेल ,
त्याला वाटले नव्हते खरंच त्याचा “बाबा” उभा येऊन ठाकेल .
हा तर होता फक्त एक ट्रेलर ,
क्लायमॅक्स वर होती सगळ्यांची नजर ,
लेकानी माझ्या संस्कारांची परतफेड केली ,
आणि हळूच त्याची मान बाबा चा आशीर्वाद घ्यायला झुकली ,
पाहुण्यांची सांगता झाली अन फोटोग्राफरची बारी आली ,
कॅन्डीड फोटो घेण्यासाठी त्याची घाई उडाली ,
एक फॅमिली पिक …यासाठी कितीतरी दशके मोजली
मोराच्या दोन खुर्चीत मध्ये बसलेले आम्ही दोघे
आणि बाजूला आम्हाला कुशीत घेऊन बसलेले नवे जोडपं
आई बाबा लांबूनच सगळे न्याहाळत होते ,
लेकीचा वनवास संपायची ते देखील वाट बघत होते ,
गुरुजींचे भाकीत खरे ठरले होते
इतके वर्ष कॉम्प्रमाईस करून ,
आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटत होते ,
राम सीतेचे कैक दशकांनी का होईना ,
मिलन झाले होते …
गुरुजींचे भाकीत खरे ठरले होते🙏🏼
सायली अथणीकर

*Consultant Physiotherapist at wellness brand Vibes healthcare Ltd.
*Heading suryadatta institute of health sciences,Bavdhan.