मी एकटी असते तेव्हा

on

मी एकटी असते तेव्हा मोकळा श्वास घेते
मी एकटी असते तेव्हा गन्ध फुलांचा मनसोक्त घेते
पाखरांचा थवा बनून आकाश निरखून येते
मी एकटी असते तेंव्हा घर भरभरून पाहते
दुर्लक्षित कोपऱ्यांना नीट आवरून घेते
घरट्यातल्या श्वासात पिल्लांचा चिवचिवाट
तोच श्वास गंधाळून घेते
आठवण करून पिल्लांची मन सावरून घेते
मी एकटी असते तेव्हा पुस्तके चाळून पाहते
हळूहळू भूतकाळाच्या अक्षरात वाहून जाते
मन हलके करून सांभाळून घेते
मी एकटी असते तेंव्हा तार सतारीची छेडते
सूर छेडता छेडता हरवून जातेमी एकटी असते तेव्हा मोकळा श्वास घेते
मी एकटी असते तेव्हा गन्ध फुलांचा मनसोक्त घेते
पाखरांचा थवा बनून आकाश निरखून येते
मी एकटी असते तेंव्हा घर भरभरून पाहते
दुर्लक्षित कोपऱ्यांना नीट आवरून घेते
घरट्यातल्या श्वासात पिल्लांचा चिवचिवाट
तोच श्वास गंधाळून घेते
आठवण करून पिल्लांची मन सावरून घेते
मी एकटी असते तेव्हा पुस्तके चाळून पाहते
हळूहळू भूतकाळाच्या अक्षरात वाहून जाते
मन हलके करून सांभाळून घेते
मी एकटी असते तेंव्हा तार सतारीची छेडते
सूर छेडता छेडता हरवून जाते
मी एकटी असते तेंव्हा जपते ‘मी’ पण
इतर नाती जपतात विसरलेले माझे पण
क्षण असतात असे दुर्मीळ
म्हणून वाटतात ते पाण्या सारखे निर्मळ
कितीही वाटले एकटी असावे
तरी माझ्या चिमण्यांना सोडून
माझी बाग कोमेजते आहे
म्हणूनच बहराचा राग मी आळवतं आहे
मी एकटी असते तेंव्हा जपते ‘मी’ पण
इतर नाती जपतात विसरलेले माझे पण
क्षण असतात असे दुर्मीळ
म्हणून वाटतात ते पाण्या सारखे निर्मळ
कितीही वाटले एकटी असावे
तरी माझ्या चिमण्यांना सोडून
माझी बाग कोमेजते आहे
म्हणूनच बहराचा राग मी आळवतं आहे

लेखिका-वैशाली देव

Advertisement